Share

नांदेड जिल्हात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार करून शेतकऱ्यांची पिळवणूक -रयत

Published On: 

नांदेड : शेतकऱ्यांचा खरीब हंगामात तोंडावर आला आहे, पेरण्यासाठी पैसेची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापूस,हरबरा शासकीय खरेदीसाठी ऑनलाईन केले त्याचा नंबर आल्यावर तो शेतीमाल घेऊन बाजर समिती व जिनिंगला शेतकरी जात आहेत त्यावेळी बाजरी समिती, जिंनिगवाले आणि अधिकारी (ग्रेडर) संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत. माल खराब आहे म्हणून त्याच्याकडून आधीचे पैसे उखळून घेत आहेत आणि हमाल उरलेल्या मालाला हात लावू देत नाहीत काही शेतकऱ्यांचा माल घरी पाठवत आहेत अश्या प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे अशा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेणात म्हटले आहे.

हार्दिक पंड्या बाप होणार हे पाहून नताशाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला…

कोरोनाच्या महामारीमुळे लॉक डाऊन असल्याकारणे शेतीच्या मालाचे भाव उतरले आहेत,खरेदी करण्यासाठी कोणी व्यापारी तयार नाही.शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शासकीय खरेदी चालू केली पण तिथे व्यापाऱ्यांचा माल नांदेड जिल्हातील बाजार समितीच्या सहमतीने सरास खरेदी चालू आहे, या सर्व गैरव्यवहाराची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी करून संबंधीतावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक

मायबाप सरकारस विनंती आहे ज्या शेतकऱ्यांचा खरेदी शक्य नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत तात्काळ कापसासाठी ४०००₹ रुपये व हरभऱ्यासाठी २०००₹ रुपयाचे अनुदान द्यावे व ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केलेला आहे त्या शेतकऱ्याचे अद्याप पैसे जमा झालेले नाहीत ते पैसे सुद्धा तात्काळ जमा करावे असं शिंदे यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!