Share

आदेशामध्ये सुधारणा केल्याने ईडीच्या संचालकांना मिळाली मुदतवाढ…

Published On: 

नवी दिल्ली: प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांचा एक विशिष्ट कार्यकाळ आणि वयोमर्यादा असते. मात्र वेळोवेळी यामध्ये झालेल्या बदलांमुळे बदल होतात. असाच बदल झाल्याने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यक्रम देखील वाढला आहे. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांना ईडेच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. ईडीच्या संचालकपदाचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असल्याने पुढच्या आठवड्यात त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार होता.

केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांच्या सन २०१८च्या नियुक्ती आदेशात बदल करून त्यांना एका वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. साठवर्षीय मिश्रा हे १९८४च्या बॅचच्या प्राप्तिकर कॅडरमधील भारतीय महसूलसेवेचे अधिकारी आहेत. अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या महसूल विभागाने यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे.

यात मिश्रा यांच्या नियुक्तीसाठी २०१८मध्ये जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतींनी या सुधारणेला मंजुरी दिली असून, मिश्रा यांची नियुक्ती पदभार सांभाळल्यापासून तीन वर्षांसाठी किंवा दुसऱ्या आदेशापर्यंत, जो पहिला असेल तिथपर्यंत राहील, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता मिश्रा यांचा कार्यकाळ वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!