औरंगाबाद : राज्य भरातील विविध विद्यापीठांमध्ये २०२०-२१ मध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएस १०% आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एस.डी.सी. विभागाचे सचिव यांच्याकडे पुढील तात्काळ कार्यवाहीसाठी पाठवली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांना निर्देशीत केले. त्यानुसार पेट-१ व २ परीक्षांच्या कागद पत्रांची पुर्तता करण्यासाठी मुदत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने १५ जुलै २०२१ पर्यंत मुदत वाढ दिल्याचे पत्रक सुद्धा प्रसिद्ध केले आहे. याबाबतच्या सर्व घटनाक्रमांचा मेल जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांना नुकताच प्राप्त झाला आहे. या निवेदनात म्हटले होते की, महाराष्ट्र राज्यामध्ये खुल्या प्रवर्गासह एस.इ.बी.सी. प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांनी आपले अर्ज एस.इ.बी.सी. मध्ये किंवा खुल्या वर्गातून अर्ज सादर केले.
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे मराठा प्रवर्गातील सर्व विद्यार्थी यांना इ.डब्ल्यू.एस. १०% आरक्षण देण्याबाबतची तरतुद राज्य शासनाने केलेली असून सुद्धा राज्यातील विविध संस्था आणि विद्यापीठांनी पी.एच.डी. विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठी एस.इ.डी.सी. हा प्रवर्गच ठेवला नव्हता. त्यात प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा समावेश असून प्रशासनाच्या या चुकांमुळे हजारो विद्यार्थी संशोधन कार्यापासून वंचित राहणार होते.
इ.डब्ल्यू.एस. प्रवर्ग नमुद केला नव्हता. त्यामुळे या हजारो विद्यार्थ्यांना इ.डब्ल्यू.एस. १०% आरक्षणाचा लाभ मिळत नाही. लाभ द्यावा असे कुठलेही निर्देश विविध विद्यापीठांना नसल्यामुळे आणि नेमकी हीच बाब विद्यापिठांनी निर्गमीत केलेल्या जाहिरातीमध्ये निर्देशित केलेली नाही. हजारो विद्यार्थी पात्र असतांना सुद्धा अपात्र ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे कायमस्वरुपी नुकसान होणार असल्याची बाब जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमुद केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! २४ तासांत एकही नवीन रुग्ण नाही, मृत्युही नाही
- राज्यपालांच्या पत्रावर मलिकांची प्रतिक्रिया; १२ आमदारांची आठवण करून देत लगावला टोला
- सरकारी व्यवस्थेचा वापर होणार नाही, इतकी दक्षता घ्या; धीरज देशमुखांचे नागरिकांना आवाहन
- ‘अजान’वर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- बॉक्सिंगचा बच्चन येतोय! फरहान अख्तरच्या ‘तुफान’चा ट्रेलर प्रदर्शित

