Share

‘महिलेचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्या ‘त्या’ नेत्यांवर भाजप काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे’

Published On: 

मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यभरात महिला अत्याचाराच्या घटनांवरून भाजपने आवाज बुलंद केला असताना आता मुंबईतील भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयातच एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेविकेच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली परिसरातील एका भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेचा भाजप कार्यकर्त्याने विनयभंगकेल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही तर तक्रार दाखल करुनही पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सत्ताधारी आता भाजपवर तुटून पडले आहेत. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे.ते म्हणाले, भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाला व महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तीचा आवाज दाबण्यासाठी तीला भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली. हे भाजपाचे महिला विरोधी रुप आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादांनी महिलेचा आवाज दाबला त्या भाजपा नेत्यांवर काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे. संपूर्ण भाजपा अत्याचार झालेल्या महिलेच्या विरोधात उभी आहे. अत्याचार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जाहीर निषेध असं सावंत यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!