Share

खळबळजनक! ‘चॅटिंग कर, अन्यथा तोंडावर अ‍ॅसिड फेकेल’, अल्पवयीन मुलीला धमकी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: अल्पवयीन मुलीला फोनवर माझ्याशी बोल नाही, चॅटींग कर तसेच तुझे फोटो पाठव नाही तर अ‍ॅसिड फेकून तुझे तोंड जाळीन अशी धमकी देणार्‍या माथेफिरु रोमीयोला मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी (दि.७) रात्री बेड्या ठोकल्या. सचिन बाबासाहेब लिपणे (२० रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे माथेफिरु रोमीयोचे नाव असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दिले.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानूसार, २ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वाढदिवसाच्या दिवशी ओळखीचा मुलगा सचिन लिपाणे याने पीडितेसह तिच्या मैत्रणींना पाणीपुरी खाण्यासाठी नेले होता. त्यावेळी त्याने पीडितेसोबत फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी त्यांनी सदर पीडीतेला दिली.

तू माझ्याशी फोनवर बोल तसेच चॅटींग कर नाहीतर हे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यामुळे पीडीतेला त्याचाशी बोलावे लागत होते. मात्र नंतर पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यावेळी आरोपीने तिला तु माझ्याशी फोनवर बोलली नाही, चॅटींग केली नाही आणि फोटो पाठवले नाही तर अ‍ॅसिड फेकुन तुझे तोंड जाळून टाकीन अशी धमकी दिली.

या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी बाजू मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!