Share

‘सिद्धार्थ’च्या प्राण्यांना मिळणार आता कुलरची हवा

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिंसग्रहालयात दरवर्षी उन्हाळ्यात पडणार्‍या कडाक्याच्या उन्हापासून प्राण्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी कुलर लावले जातात. तसेच आवश्यक पर्यायी व्यवस्था देखील केली जाते. यंदाही यासंबंधीची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. चार वर्षांपूर्वी पालिकेने कुलर खरेदी केले होते. त्यांची दुरूस्ती करून ते पिंजर्‍यांत लावले जाणार आहेत.

मराठवाड्यातील एकमेव असलेले प्राणिसंग्रहालय म्हणून सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय ओळखले जाते. त्यामुळेच देशी, विदेशी पयर्र्टकांसोबतच मराठवाड्यातील पर्यटकांचे हे विशेष आकर्षण आहे. सध्यस्थितीत या प्राणिसंग्रहालयात वाघांसहीत बिबटे आहेत. त्याच बरोबर हरिण, काळविट, माकड, ससे, निलगायसह विविध प्रकारचे रंगबिरंगी पक्षी देखील आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे.

प्राण्यांच्या पिंजर्‍यात कुलर तर हरणं, निलगाय, काळविटांच्या पिंजर्‍यांमध्ये स्प्रिंकरल लावून पाणी शिंपडून वातावरण थंड करण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. चार वर्षांपूर्वी पालिकेने खरेदी करुन ठेवलेले कुलर दुरुस्तीसाठी संबंधीत विभागातील कर्मचार्‍यांना बोलावून त्याची सफाई करण्यात येणार आहे. काही बिघाड झाला किंवा नाही, याची तपासणी करुन सुस्थितीमधील कुलर यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!