औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने अभियांत्रिकी, फार्मसीसह ४१ विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ६ एप्रिल पासून सुरु होत आहेत. तसेच बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षांचाही परीक्षा याच वेळी सुरु होत असून ‘कोविड‘ संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले दिले आहेत.
बीए, बीएस्सी बीकॉम आदी परांपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरु झाल्या आहेत. तर ६ एप्रिलपासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षा सुरु होत आहेत. औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयातील परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा होत आहेत. विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा देण्याची मुभा दिली आहे.
ऑफलाईन परीक्षा देणाऱ्यांसाठी ‘होम सेंटर‘ असणार आहे. तर ऑनलाईन परीक्षा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे परीक्षा देता येईल. परीक्षा केंद्रावर ‘कोविंड संदर्भात उपाययोजना‘ फिजीकल डिस्टिन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्याची सूचना कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, एमसीए, बी.टेक, एम.टेक, एम.फार्मसी, बी.सीए, बीबीए, बीएस डब्ल्यू, बी.कॉम ई – कॉमर्स, विधि, पत्रकारिता पदवी आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी ३६ नवीन केंद्र असणार अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे १५ हजार विद्यार्थी
२१ अभियांत्रिकी तर विधी व औषधनिर्माणशास्त्रचे १७ नवीन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. या केंद्रावर १४ हजार ९४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अभियांत्रिकी (७ हजार ५०१), तंत्रज्ञान (१ हजार ५८९), विधी (१ हजार ४१०) औषधनिर्माणशास्त्र (३ हजार ९२२), विज्ञान व तंत्रज्ञान (५२१ ) या विषयांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद नाभिक महामंडळाचा विरोध
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

