Share

राज्य सरकारचे ‘हे’ अपयश सर्वस्वी निकृष्ट नियोजनाचे, अकार्यक्षमतेचे द्योतक आहे : मेधा कुलकर्णी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई आणि पुणे या दोन शहरांत कोरोनाची नव्याने लागण होणार्यांची संख्या मोठी आहे त्यामुळेच सरकारच्या चिंता वाढत आहे .

याच मुद्यावरून  विरोधी पक्ष असलेया भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे, तसेच राज्य सरकारमध्ये समन्वय नसून यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचं म्हटलं आहे. आता भाजपच्या नेत्या आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत तसेच उत्तरप्रदेशची लोकसंख्या जास्त असूनही तिथे कशी स्थिती हाताळली जात आहे याची तुलना केली आहे. त्यांनी हे राज्य सरकारचं अपयश असून सरकार आपल्या अकार्यक्षमतेच खापर नागरिकांवर टाकू शकते असंही त्या  म्हणाल्या आहेत.

आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर त्यांनी म्हटलय, ‘शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या आणि मृत्यू दर सर्वाधिक आहे. (देशाच्या सुमारे 1/4).. महाराष्ट्रात कोरोना बरोबर सामना करण्यात, राज्य शासन अपयशी का ठरले ? महाराष्ट्रात रुग्ण संख्येचा आकडा 4000 + असून उत्तरप्रदेशची लोकसंख्या आपल्या दुप्पट असूनही, त्यांची रुग्ण संख्या 1084 आहे. राज्य सरकार हे खापर, नागरिकांच्या वर्तनावर फोडणे शक्य आहे. काही नागरिकांमध्ये गांभीर्याचा अभाव असला तरी हे सार्वत्रिक नाही.. हे अपयश सर्वस्वी निकृष्ट नियोजनाचे, अकार्यक्षमतेचे द्योतक आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!