Share

भाजपने सर्व पर्याय वापरले तरीही ‘या’ राज्यात ठरली कॉंग्रेसच सरस

Published On: 

नवी दिल्ली : देशातील आठ राज्यात राज्यसभेच्या 19 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला आठ जागावर विजय मिळाला आहे. तर कॅाग्रेस 4 जागा जिंकल्या आहेत. भाजपला गुजरातमध्ये तीन, मध्यप्रदेशमध्ये दोन आणि राजस्थान, झारखंड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे. तर कॅाग्रेसला राजस्थानमध्ये दोन आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एक एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार – आव्हाड

राज्यसभेच्या १९ जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या. राजस्थानमध्ये तीन जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसला दोन, तर भाजपला एक जागा मिळाली. एक जागा जिंकण्याचे संख्याबळ असतानाही भाजपने दोन उमेदवार उभे केल्याने चुरस वाढली होती.

ते केवळ ‘फेकू’ नाही तर ‘घाबरट’सुद्धा, कन्हैय्या कुमारची मोदींवर टीका

आमदार फुटण्याची भीती असल्याने काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी हलविले होते.भाजपवर कॉंग्रेस नेत्यांनी आमिष दाखवत असल्याचा देखील आरोप केला होता. यानंतर भाजपनेही आपल्या आमदारांना एकत्र ठेवले होते. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे दोन तर भाजपचा एक उमेदवार निवडून आला. काँग्रेसचे संघटनात्मक सरचिटणीस केरळचे वेणूगोपाळ यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठविण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!