Share

लॉक डाऊनच्या परिस्थितीतही औरंगाबादमध्ये रोज येत आहेत साडेचार हजार लोक

Published On: 

औरंगाबादः कोरोना मुळे राज्यात लॉक डाऊन केले आहे. राज्यात जिल्ह्याच्या हद्दी सील करण्यात आले आहेत. तरीही औरंगाबादमध्ये रोज साडेचार हजार लोक दाखल होतात. ही बाब औरंगाबाद महानगरपालिकेने शहरात येणाऱ्या ३ ठिकाणच्या स्क्रीनिंग केंद्रावरून मिळालेल्या माहिती द्वारे उघड झाली आहे.

औरंगाबाद महापालिकेने औरंगाबाद पुणे महामार्गावर गोलवाडी येथे स्क्रीनिंग केंद्र उभारले आहे. तर दुसरे केंद्र औरंगाबाद जालना रस्त्यावर केंब्रिज शाळेजवळ आहे. तिसरे केंद्र औरंगाबाद जळगाव रस्त्यावर हर्सूल टी पॉईंट जवळ सुरू केले आहे. पण औरंगाबाद पैठण रस्ता आणि औरंगाबाद बीड रस्ता मात्र यातून वगळण्यात आला आहे. फक्त तीन केंद्रांवर होणारी स्क्रीनिंग लक्षात घेता साडेचार हजार लोक रोज शहरात दाखल होत असतील, तर त्यामध्ये बीड आणि पैठण रस्त्याची भर पडली तर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

एका बाजूला उद्योगधंदे बंद झाल्याने शहरातील परप्रांतीय पायी आपल्या गावाकडे निघालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला रोजगारासाठी औरंगाबाद सोडून बाहेर गेलेले लोक परत आपल्या घरी येत आहेत. कोरोना चा एक रुग्ण औरंगाबाद आढळला होता. तोही बरा होऊन त्याच्या घरी परतला आहे. पण आता हे बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांमुळे पुन्हा कोरोना चा धोका वाढतो आहे.

हेही पहा – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!