Share

‘विन्या राऊत तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही’

Published On: 

मुंबई:- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली होती.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे.  बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी काल चिपळूण येथे केली आहे.

दरम्यान, खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ‘विन्या राऊत मीटर चोर तुझ्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणेंचं काहीही बिघडू शकत नाही. तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही. बेवडा मुलगा निस्तरता येत नाही म्हणून दुसऱ्याना बोलून काही बदलणार नाही. जनतेने काम करायला निवडून दिले आहे, राणेंवर टीका करायला नाही.’ असं ट्विट निलेश राणे यांनी करून विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या  बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!