Share

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी १३८ फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांबाबतच्या खटल्यांसाठी राज्यात 138 जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृहमंत्रालय आणि राज्य सरकारचं यावर एकमत झालं असून या 138 कोर्टांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे जवळपास 29 हजार प्रलंबित खटले चालणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात महिलांवरील अत्याचाराचे जवळपास 29 हजार खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. महिलांच्या वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे. तर पीडितांना तत्काळ न्याय देण्यासाठी जलदगती न्यायालयांची (फास्ट ट्रॅक कोर्ट)मागणीही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता महराष्ट्रात 138 जलदगती न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात देखील दिशा सारखा कायदा आणावा यासाठी राज्य सरकारने यासाठी चार सदस्यीय समितीचे गठन केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि परिवहन मंत्री अनिल परब या समितीत असणार आहेत. ही समिती आंध्र प्रदेशमधील दिशा कायदा, त्यातील तरतुदी, बलात्कार आणि अॅसिड अॅटक सारख्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार आहे. एकीकडे वर्धा प्रकरण एका महिन्यात सुनावणी होऊन आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी देखील राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. तर दुसरीकडे नवीन कायदा आणता येईल का? याची पण चाचपणी सुरू झाली आहे.

दरम्यान, राज्यातील गुन्हेगारीत महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे उघड झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तर औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही अशीच एक घटना समोर आली. एका महिलेच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात पीडितेचा मृत्यू झालाय. तर, हिंगणघाटमधील पीडिता अजूनही जगण्यासाठी संघर्षच करत आहे. त्यानंतर नवी मुंबईतही एका महिलेला आधी जाळून नंतर फासावर लटकावून मारल्याची घटना घडली. या घटनांमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. लोकं रस्त्यावर उतऋण दोषींनाही असाच जाळून मारण्याची भाषा बोलु लागले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!