Share

२० लाख कोटींच्या पॅकेजवर उद्योजकांमध्येही नाराजी; युवक काँग्रेसने केली पॅकेजची पोलखोल

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या बहुचर्चित 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून छोटे, लघु व मध्यम उद्योजकांना सुद्धा काहीच मिळाले नसून हे पॅकेज म्हणजे केवळ पोकळ घोषणा होती हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून, कहां गये वो 20 लाख करोड ? या राज्यव्यापी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लघु व मध्यम उद्योगातील व्यवसायिकांशी संवाद साधला.

युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन छोटे व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला. जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. कर संकलन पूर्वीसारखेच आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये कर्जाची सोय केलेली आहे ते कर्ज व्याजासकट परत करायचे आहे मग ही मदत कशी. कुठल्याही व्यापाऱ्याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. मोदी फक्त घोषणा करतात, मोठ मोठे आकडे बोलतात पण प्रत्यक्षात काही मिळाले असे आजवर कधीच झाले नाही, असा नाराजीचा सूर उद्योजकांमध्ये आहे.

लघु व मध्यम उद्योगक्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सरकारने आर्थिक मदत व जीएसटीमध्ये सवलत देणे गरजेचे होते. तीसुद्धा दिलेली नाही. शेतकऱ्यांप्रमाणेच लघु व मध्यम उद्योजकांच्या तोंडाला या पॅकेजने पाने पुसली असून २० लाख कोटींचे पॅकेजही जुमलाच होता हे आता सिद्ध झाले आहे, असे सत्यजीत तांबे म्हणाले.

युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून उद्योजकांच्या मागण्याही समोर ठेवल्या आहेत.दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या मोदी सरकार समोर ठेवण्यात येत आहेत. पुढील 2 दिवसात नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली ? याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार आहे.

दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार महायुतीच्या बैठकीत निर्णय

राज्य पोलिस तक्रार प्राधीकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नियुक्ती का?

विज बिल ग्राहकांना न्याय देणारा निर्णय घ्या, आमदार किशोर जोरगेवार यांची अजितदादांकडे मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!