Share

उद्योजक मानसिंह पवार यांना यंदाचा’औरंगाबाद भूषण’ पुरस्कार जाहीर, कोरोना काळात रोटरीने निभावली सामाजिक बांधिलकी

Published On: 

औरंगाबाद : रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘औरंगाबाद भूषण पुरस्कार यंदा सामाजिक, उद्योग, व्यापार तसेच विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे आपली जबादारी अत्यंत निस्पृहपणे निभावणारे मानसिंह पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. क्लबतर्फे आयोजित एका पत्रकार परिषदेत क्लब अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी ही घोषणा केली

हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद गेली अनेक वर्षे, ज्यांच्या कार्याचा दरवळ सगळीकडे पसरला आहे, अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना प्रदान करीत असतो. आतापर्यंत शहरातील १५ नामवंतांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. या पुरस्काराच्या वितरणाचा ऑनलाइन कार्यक्रम दिनांक १८ जून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कोव्हीड नियमांचे पालन करून मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे

रोटरी इंटरनॅशनल ही संस्था जगभर सामाजिक कार्यात अग्रभागी असते. सामाजिक मानवतावादी सेवा प्रदान करून जगभरात सद्भावना आणि शांतता प्रस्थापित करण्यात आपला सहभाग क्लब सातत्याने नोंदवीत आला आहे. कोरोना महामारीच्या काळातही रोटरीने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये उत्तरदायित्व स्वीकारून पूर्ण केले. त्यामध्ये गरजू रुग्णांना औषधी व पी पी किट वाटप, नागरिकांसाठी लसीकरण केंद्र, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बँक, स्नेह सावली या सामाजिक वैद्यकीय संस्थेस मदत करून पोस्ट कोव्हीड सेंटर , जिल्हा परिषदेच्या सूचनेप्रमाणे सुधारित शवदाहिनी ग्रामीण भागात दहा ठिकाणी बसविण्याची योजना पूर्णत्वाकडे आहे.
जगभरातून देवीच्या रोगानंतर पोलिओ संपुष्टात आणण्याचे काम रोटरीने केले.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद यांच्यातर्फे आतापर्यंत तीनशे शाळांना स्वच्छ पेयजल सुविधा पुरविली असून, हार्ट ब्रिगेड नावाने दोन ॲम्बुलन्स सर्व इमर्जन्सी सुविधेसह धूत आणि बजाज हॉस्पिटल यांना दिल्या आहेत . एड्स टेस्टिंग लॅब एमजीएम येथे कार्यरत आहे. स्वयंसिद्धा मातृपालक शाळेमध्ये फिजिओथेरपीला लागणारे साहित्य रोटरीतर्फे पुरविण्यात आले असून, हजारो आय कॅटरॅक्ट सर्जरी क्लबच्या सहकार्याने झाल्या आहेत. युवकांच्या कलागुणांना वाव मिळाला यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रोटरी युथ फेस्टिवलच्या माध्यमातून स्टेज उपलब्ध करून दिली जाते. लरनिंग किट व पुस्तकांची लायब्ररी अलमारीसहित अनेक शाळांना दिली आहे.

जागतिक महामारीच्या काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरिबांना अन्नदान, भोजनदान करण्यात आले. कठीण काळात जिल्हा रुग्णालयात पीपीई किट, मास्क, हॅण्ड ग्लोज देऊन मदत करण्यात आली 12 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बँक चालू आहेत. त्याचा फायदा अनेक रुग्णांना होत आहे. क्लबतर्फे नागरिकांसाठी व्हॅक्सिनेशन कॅम्प मनपाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. आता ग्रामीण भागामध्ये सुधारित शवदाहिनी बसविण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी दिली. या वेळी सर्वश्री मुकुंद सांगवीकर, समीर कानडखेडकर, सुनील बागूल. सतीश लोणीकर मिलिंद सेवलीकर, सुरज डुमणे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!