Share

टॉस जिंकून इंग्लंडने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Published On: 

पुणे : भारत आणि इंग्लडसंघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी इंग्लंड संघाचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतीय इलेव्हनमधून कुलदीप यादवला  बाहेर केले असून टी नटराजनचा समावेश करण्यात आला आहे.

आजचा सामना जिंकून मालिका विजयी होण्याची दोन्ही संघांकडे अखेरची संधी असेल. विशेष म्हणजे यापूर्वी इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने कसोटी आणि टी-20 मालिका जिंकली असल्याने एकदिवसीय सिरीज जिंकून भारत इंग्लिश टीमचा सफाया करू इच्छित असतील. टीम इंडियासाठी रोहित शर्मा-शिखर धवनची जोडी सलामीला उतरेल. यापूर्वी दोंघांना प्रभावी भागीदारी करता आली नसल्याने यंदा त्यांच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा असेल.

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: जोस बटलर (कॅप्टन/विकेटकीपर), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेविड मलान, मोईन अली, सॅम कुरन, मार्क वूड, आदिल रशीद आणि रीस टोपली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!