Share

महिलांच्या सक्षमीकरणामुळे भारत मजबूत राष्ट्र होईल – रामदास आठवले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांची जोपासना केली पाहिजे. त्याचबरोबर समाजाच्या सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी आणि समान न्याय दिला पाहिजे. महिलांच्या सक्षमिकरणामुळेच भारत मजबूत राष्ट्र होईल ;सर्व समाजाच्या महिलांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रसरकार कटिबद्ध आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

कोझिकोड मधील अलंकापुरी हॉल मध्ये येथील सामाजिक कार्यकर्त्या नझरत जहां यांच्या सर्वजनिक जीवनातील महिलांच्या प्रश्नावर आधारित ‘पेंन्न राज्यते तोडबोल’ या मल्याळी पुस्तकाचे प्रकाशन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘जेंव्हा महिला राजकारणात ‘ असा अर्थ या मल्याळी पुस्तकाचा आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक विरोधी कायदा करून मुस्लिम महिलांना न्याय दिला. नुसरत जहां या मुस्लिम महिलेने राजकारणातील महिलांबाबत पुस्तक लिहून महिलांचे प्रश्न मांडण्याची हिम्मत दाखविली. राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिलांना अनेकदा योग्य सहकार्य मिळते असे होत नाही. त्यामुळे महिलांना सार्वजनिक जीवनात अजून समाजाचा पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याची खंत मांडणारे हे पुस्तक नुसरत जहां यांनी हिंदी आणि इंग्रजी मध्ये अनुवादित करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान हक्क मिळावेत या साठी हिंदुकोड बिल लिहिले. ते तत्कालीन नेहरू सरकारकडून मंजूर केले जात नसल्याचे पाहून आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. हा इतिहास सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे महिलांना देशात समान अधिकार प्राप्त झाले आहेत. लेखिका नुसरत जहां यांनी लिहिलेले पुस्तक चांगले असून या पुस्तकाचा देशभर प्रसार झाला पाहिजे अशी अपेक्षा ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली. भारतात विविध जाती धर्माचे लोक आहेत. मात्र सर्व जण मूळ भारतीय आहेत. भारतात सर्वप्रथम बौद्ध धम्म होता.त्यानंतर हिंदू आणि मग परकीय आक्रमण होऊन मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार भारतात झाला. असे सर्व धर्मीय लोक असले तरी सर्व मूळ भारतिय आहेत. सर्वधर्मसमभाव या तत्वाची जोपासना करून भारत मजबूत करुया असे आवाहन करून सर्व समाजाच्या महिलांनी रिपब्लिकन पक्षात सामील होण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195661230410616833?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195659539015593985?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195659389044002816?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!