🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी decongest करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी ‘झी २४ तास’च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे #e_conclave मध्ये बोलत होते.
‘ते’ काॅल रेकाॅर्ड ऐकवले तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोप्या पडळकरला रस्त्यावर फिरू देणार नाहीत
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असं मत गडकरी यांनी व्यक्त केले. मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचे नसून मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सध्या मुंबईमध्ये करोना विणाणूचं संकट गंभीर बनलं आहे हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राने कन्व्हर्जन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे असं मत गडकरी यांनी मांडले.
आनंदाची बातमी : मुंबईत अनेक लोकप्रिय मालिकांच्या शूटिंगला सुरुवात
पुढे बोलताना गडकरी म्हणाले,भविष्यात राज्यातील वाहने ही एलएनजी, सीएनजी आणि इथेनॉलमिश्रीत पेट्रोलवर चालवण्यात यावीत. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी होईल. तसेच वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचेल, असे गडकरी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
