Share

आनंदाची बातमी : मुंबईत अनेक लोकप्रिय मालिकांच्या शूटिंगला सुरुवात

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. कोरोनामुळे अनेक क्षेत्रावर परिणाम झाल्याचा दिसून आला, पण आता हुळहुळ सर्व क्षेत्र पुन्हा सुरु होताना दिसत आहे. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले शूटिंग हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सरकारच्या नियमांचं पालन करत अनेक मालिकांनी त्यांच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. निर्माती एकता कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकांच्या शूटिंगच्या तयारीचा एक फोटो पोस्ट केला आहे.

कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘छोटी सरदारनी’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘शुभारंभ’, ‘नाटी पिंकी की लंबी लव्ह स्टोरी’ आणि अँड टीव्ही वाहिनीवरील ‘एक महानायक डॉक्टर बी. आर. आंबेडकर’, ‘संतोषी माँ सुनाए विराट कथाएं’ या मालिकांची शूटिंग मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आणि मुंबई बाहेरील नायगाव परिसरात सुरु झाली आहे.

शशी मित्तल यांच्या माहितीनुसार सेटवर फक्त ३० जण काम करत आहेत. तर कलाकार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. सेटवरील सर्वांना सुरक्षा किट देण्यात आली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘ये है चाहतें’ या मालिकांचीही शूटिंग सुरू झाली आहे. तर झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

धक्कादायक : २४ तासात देशात १४ हजार रुग्णाची वाढ

पेट्रोलवर बोला म्हणताच फडणवीसांसह भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद आटोपली

मोठी बातमी: महाराष्ट्रात ‘या’ शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!