Share

‘पुरुष नेत्याच्या संपर्कात असलेल्याच महिलेला निवडणुकीचं तिकीट दिलं जातं’

Published On: 

हैद्राबाद : कोणत्याही निवडणुकीत महिला नेत्याला जर निवडणुकीचं तिकीट मिळवायचं असेल तर पुरुष नेत्याशी संपर्क ठेवावा लागतो. पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केला आहे.

त्या हैद्राबादमध्ये मौलाना आझाद नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या सक्रिय राजकारणातील सहभागावर चिंता व्यक्त केली आहे. आता पर्यंत महिलांनी अनेक सर्कर्णामधील महत्वाचं पद भूषवलं आहे. मात्र त्यांची संख्या अतिशय कमी असल्याची खंत देखील व्यक्त केली आहे.

त्या म्हणाल्या, ‘कोणाताही राजकीय पक्ष महिला नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यासाठी उत्सूक नसतो. महिला निवडणूक जिंकू शकेल का?, असा प्रश्न उपस्थित करत महिलांना डावललं जातं.’ दरम्यान, ‘ज्या व्यक्तीची प्रतीमा मलीन झालेली असते. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते’ असं निरीक्षण असल्याचे सांगत त्यांनी भारतातील सर्व पक्षांवर निशाणा साधला आहे.

अगदी स्थानिक निवडणुकांपासून ते संसदेपर्यंत निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. महिलांचा प्रत्यक्ष राजकारणात सहभाग वाढावा, महिलांचे प्रश्न समजून त्यांनी सोडवण्यासाठी प्रतिनिधित्व करावं अशी अपेक्षा असते. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचे तिकीट हवे असेल तर लॉबिंग केली जाते, यावर त्यांनी ताशेरे ओढले आहेत. रेखा शर्मा यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!