Share

निवडणूक आयोग व आरोग्य मंत्रालयाची आज बैठक; आगामी निवडणुकीसंदर्भात निर्णयाची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: लवकरच देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र दुसरीकडे ओमिक्रॉनचा धोकाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवरच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवदेखील सहभागी असणार आहेत. ओमिक्रॉनचा (Omicron) धोका, विषाणूचे स्वरुप आदींबाबत आरोग्य विभाग निवडणूक आयोगाला माहिती देणार आहे.

दरम्यान प्रौढ लोकसंख्येला कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला असेल, तर ओमिक्रॉनचा धोका कितपर्यंत वाढला आहे. अशा वातावरणात निवडणुका घेतल्या तर कोरोनाच्या या नव्या विषाणूला कडे रोखता येईलयाबाबत केंद्रीय निवडणूक आयोग आरोग्य मंत्रालयाकडून माहिती घेऊ शकते.

दरम्यान ३ जानेवारीपासून १५ ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी देशात लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्यात येणार आहे. मात्र अशा परिस्थितीतही निवडणुका घेतल्यास ओमिक्रॉनचा कितपत धोका उद्भवू शकतो, याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!