🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : माढा लोकसभेच्या अटीतटीच्या लढाईत भाजपने अखेर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हस्तगत केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव करत भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर विजयी झाले आहेत. माढ्याच्या लढाईत अखेरपर्यंत आकड्यांचा खेळ सुरु होता, त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची धाकधूक शेवटपर्यंत कायम होती. रणजीतसिंह निंबाळकर यांचा जवळपास ७५ हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून राजकीय उलथापालथ झाली, त्यामुळे मार्च – एप्रिलमध्येच नेत्यांना घाम फुटल्याचं पहायला मिळालं, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, संजय मामा शिंदे यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी, मोहिते पाटील यांच्या ऐवजी फलटणच्या रणजितसिंह निंबाळकरांना भाजपने दिलेली उमेदवारी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे.
आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून संजयमामा आणि रणजीतसिंह यांच्यामध्ये अटीतटीची लढाई सुरु होती, कधी शिंदे पुढे तर कधी निंबाळकर अशी परिस्थिती पहायला मिळाली, मात्र माळशिरस, फलटण, करमाळा आणि माण-खटावमध्ये विजयी आघाडी मिळाल्याने रणजीतसिंह निंबाळकर विजयी झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
हातकनंगले – धैर्यशिल माने ( शिवसेना )
कोल्हापूर – संजय मांडलिक ( शिवसेना )
सातारा – उदयनराजे भोसले ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
सांगली – संजय काका पाटील ( भाजप )
बारामती – सुप्रिया सुळे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
शिरूर – अमोल कोल्हे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
सोलापूर – डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी ( भाजप )
मावळ – श्रीरंग बारणे ( शिवसेना )
पुणे – गिरीश बापट ( भाजप ) आघाडीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
