टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. देशात भाजप आणि मित्रपक्ष यांना या निवडणुकीत मोठ यश मिळत आहे. परंतु निकाल जाहीर होत नाहीत तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून ‘चौकीदार’ हा शब्द हटवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ असं विधान केले होते. त्यानंतर भाजपच्या सगळ्याचं नेत्यांनी आपापल्या ट्वीटर वरचे नाव बदलून ‘चौकीदार’ हा शब्द नावापुढे लावला होता परंतु आता निकाल जाहीर होताच नरेंद्र मोदींसह भाजपच्या इतर नेत्यांनी चौकीदार हा शब्द काढून टाकायला सुरुवात केली आहे.
Now, the time has come to take the Chowkidar Spirit to the next level.
Keep this spirit alive at every moment and continue working for India’s progress.
The word ‘Chowkidar’ goes from my Twitter name but it remains an integral part of me. Urging you all to do the same too!
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2019
दरम्यान, नरेंद्र मोदींनी ‘चौकीदार’ हा शब्द काढून टाकताना इतर नेत्यांनाही चौकीदार हा शब्द काढून टाकावा असे आवाहन केले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

