🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच काय होणार हा मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे.
ट्विटमध्ये एकनाथ शिंदे म्हणालेत कि, गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. तसेच महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वी लाईव्ह येत आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबत खुलासा केला आहे. मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायाल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुखपद देखील सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे, असं ते लाईव्हमध्ये बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
