Share

एकनाथ शिंदे, शिवसेनेचे शिष्टमंडळ औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर

Published On: 

औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनिल देसाई, सुनील प्रभू व शिवसेनेचे शिष्टमंडळ दुष्काळ ची पाहणीसाठी औरंगाबादेत दाखल झाले आहे.

एकीकडे भाजप-शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहेत. यात शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सत्ताधार्यां तर्फे कुठलीही हालचाल करण्यात आलेल्या नाही.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार ओला दुष्काळाच्या दौऱ्यावर उतरल्यामुळे शिवसेना व भाजप खडबडून जागे झाले. त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीना त बैठका आणि पाहाणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यानुसार काल औरंगाबादेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

त्यापाठोपाठ आज एकनाथ शिंदे अनिल देसाई सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांची शिष्टमंडळ हे गंगापूर, खुलताबाद करंजखेडा कन्नड भराडी फुलंब्री येथे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे.

त्यानंतर रविवारी मुक्कामी थांबून दुसऱ्या दिवशी वैजापूर येथे भेट देत सायंकाळी महसूल कृषी विभाग व इतर अधिकार्‍यांची आढावा बैठक घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190568704787898369?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190567551790505985?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!