Share

Eknath Shinde | “आत्तापर्यंत सगळे दबून बसले होते, मात्र आता…”; मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला निशाणा

Published On: 

Eknath Shinde | मुंबई : कालपासून दिवाळी सणाला सुरूवात झाली आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून गेल्या 10 वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही मनसेने शिवाजीपार्कवर दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. आपल्याला माहित आहे की, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्यामध्ये सतत कोल्ड वॉर सुरूच असते. यावेळीही ते पाहायला मिळालं. कार्यक्रमच्यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला असल्याचं दिसून आलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

या वर्षी सर्व सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याचं आमच्या सरकारने ठरवलं होतं. हे वचन आम्ही पाळलं आहे. आत्तापर्यंत सर्व दबून बसले होते. मात्र, आता सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या महाविकासआघडी सरकारवर हल्ला केला आहे.

मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मनात इच्छा असतानाही अनेक वर्षांपासून येता आलं नाही. त्यासाठी योगायोग लागतो, अशी खंतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. राज ठाकरेंनी या सरकारला हक्काने सूचना कराव्यात. राज ठाकरे मध्यरात्रीसुद्धा मागण्या करू शकतात, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
तसेच,सरकारने ‘एनडीआरआफ’चे नियम बाजुला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांना मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अवकाळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पेचामध्ये अडकला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा,अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!