Aravind Sawant । मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना आपल्याला रोजच पाहायला मिळत आहे. अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना खालची पातळी गाठली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी टिळकांच्या एका विधानाचाही संदर्भ दिला.
ते म्हणाले, “पूर्वी लोकमान्य टिळक म्हणाले होते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? इंग्रजांच्या विरोधात. आत्ता तसं काही म्हटलं तर ताबडतोब देशद्रोह होईल. ज्या पद्धतीने गुन्हे दाखल होतायत, ते पाहाता व्यंगचित्रकार, नकलाकार जन्माला आलेच नसते. जाणीवपूर्वक शिवसेनेच्या लोकांवर ‘चुन चुन के केस दाखिल करेंगे’, असं सध्या चालू असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“त्यांना वाटतंय की आम्ही दबावात येऊन एक तर त्यांच्या गटात जाऊ किंवा गप्प बसू. त्यांनी अजून ओळखलं नाहीये. शिवसेनेचा चेंडू जितका जोरात आपटाल, तेवढा तो जोरात उसळून वर येतो. त्यामुळे या सगळ्याचं आम्हाला भय वाटत नाही”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
सावंत म्हणाले, “दिवाळीत फटाके वाजतात. तसे हे वाजतायत. काही लवंगी असतात, काही बार असतात.सोडून द्यायचं. उद्धव ठाकरेंचं मला खरंच आश्चर्य वाटतं. जेव्हा हे सगळं सुरू झालं, जेव्हा कोर्ट-कचेऱ्या सुरू झाल्या तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं की, ‘देशातली लोकशाही जिवंत राहील की नाही हा प्रश्न आहे’. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर रोज घाव घातला जात असल्याचं सावंत म्हणालेत. अभिव्यक्ती स्वातंत्र, लेखनाचं स्वातंत्र्य आहे. त्याचा आम्ही वापर करत असू, तर त्यात गैर काय केलं हे सांगता आलं पाहिजे”, असं अरविंद सावंत म्हणाले.
महाराष्ट्रात सीबीआयला थेट तपासाची परवानगी देत शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय फिरवला. याबाबत बोलताना सावंत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “सीबीआयला अनेक राज्यांनी दार बंद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंच तेव्हा म्हटलं होतं की सीबीआय म्हणजे सरकारचा पिंजऱ्यातला पोपट आहे. ईडी, निवडणूक आयोग हे सगळे पोपटच आहेत. केंद्रातली दोन माणसं या पिंजऱ्यातल्या पोपटांना खाऊ घालतात, दम देतात, भय घालतात. या यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांच्या मनालाही हे पटतं की नाही, असा मला प्रश्न पडतो”, असं सावंत यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup | वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन भावुक, म्हणाला…
- Praveen Darekar । “दिवा विझताना जसा फडफडतो तशीच भास्कर जाधव यांची शेवटची फडफड सुरू आहे”
- Prasad Lad । “भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल आहेत”; प्रसाद लाड यांची जीभ घसरली
- Nilesh Rane । हा चिपळूणचा डुक्कर, त्याला चिखलातच लोळवणार; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना इशारा
- Rupali Patil | चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाली पाहिजे; सकल मराठा समाजाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

