Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. सध्या राज्यात चालू असलेल्या सीमावादावरुन मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे.
कर्नाटकच्या सचिवांनी सीमाप्रश्नाबाबत दिलेल्या पत्राची मला माहिती नाही. कर्नाटक सीमाप्रश्नावर राजकरण करण्यापेक्षा त्यावर मार्ग काढा. सरकारवर आरोप -प्रत्यारोप करणे सुरू आहे. महाराष्ट्रात राजकारण्यांची स्पर्धा सुरू आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
याबाबत बोलताना, अडीच वर्ष कुणाचे तोंड उघडले नव्हेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आरोप प्रत्यरोप करण्याची स्पर्धा सुरू आहे. आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. लोकांची काम करायची असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, जत तालुक्यासंदर्भात बैठक झाली आहे. आरोग्य, रस्ते याबाबतच्या प्रश्नांवर चर्चा झाली. पाण्याच्या प्रश्नावर काम सुरू झालं आहे. म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळेल. कायमस्वरुपी तोडगा मिळेल. जत तालुक्यातील लोकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “ते काय स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात जाऊन आलेत का”, शिंदे गटाचा संजय राऊतांवर खोचक सवाल
- Eknath Shinde | “येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटातील ‘या’ नेत्याची काव्यमय टीका
- Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना हात जोडले, म्हणाले…
- Rohit Pawar | महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवारांचं ‘आत्मक्लेश’ आंदोलन
- Sanjay Raut | “आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचं उदयनराजेंना आव्हान


