Share

Sanjay Raut | “ते काय स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात जाऊन आलेत का”, शिंदे गटाचा संजय राऊतांवर खोचक सवाल

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये भाजप (BJP) सत्तेत आहे. अशातच या दोन्ही राज्यांमधील भाजप नेते सीमाप्रश्नी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या टीकनेंतर आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत आम्हाला गद्दार म्हणणारे कोण, ते काय स्वातंत्र्य लढ्यात तीन महिने आत जाऊन आले आहेत का? त्यांनी आता आराम करावा. त्यांना आता या पुढे सोसणार नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत असताना देसाई यांनी म्हटलं आहे.

याबाबत बोलत असताना, कर्नाटकच्या सरकारनं 100 पत्र लिहिली तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. मराठी भाषिक लोकांसाठी त्यांचं म्हणनं ऐकूण घेण्यासाठी आम्ही 6 तारखेला बेळगावला जाणार आहोत. आम्ही 3 तारखेलाच जाणार होतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने अभिवादन कार्यक्रम असल्यामुळे त्याठिकाणी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हा देश लोकशाहीनं चालणार देश आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी याठिकाणी येऊ नये, असं कर्नाटकाच्या मुख्य सचिवानं किंवा मंत्र्याने म्हणने योग्य नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!