Eknath Shinde | मुंबई : राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं असून शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेतलं नाही, असा दावा केला आहे. त्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याबाबत राष्ट्रवादी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाकडून शरद पवार आणि ठाकरे गटाला खोचक टोला लागवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर देखील निशाणा साधत काव्यमय टीका केली आहे.
नरेश म्हस्के यांची कविता :
शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही,
यात शिवरायांचा अपमान नाही, भ्रष्टवादींच्या गजभियेना महाराज बनून ऐऱ्या गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही?,
यात शिवरायांचा अपमान नाही?
येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी
एकदाही एखादा गड चढला नाही
यात शिवरायांचा अपमान नाही?
शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात शिवरायांना
शरदमुखचंद्र कार्यकर्ते चिकटवतात
भ्रष्टवादीच्या ऑफिशियल अकाउंट वरून ट्विट करतात
यात शिवरायांचा अपमान नाही?
उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत
दम तर तसा काहीच नाही भाऊत
पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना
सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना
यात शिवरायांचा अपमान नाही?
औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले
कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले
यात शिवरायांचा अपमान नाही?
अंधारे बाई तर कहरच करतात
निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर
त्याच्या आईची तुलना
जिजाऊशी करतात
यात शिवरायांचा अपमान नाही?
हजारो हिंदू यमसदनी धाडले त्याच टिपू सुलतानाचे नाव यांनी पालिकेच्या मैदानाला दिले
यात शिवरायांचा अपमान नाही?
यात शिवरायांचा अपमान नाही?
शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..
यात शिवरायांचा अपमान नाही?भ्रष्टवादींच्या गजभियेना महाराज बनून ऐऱ्या गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही?
यात शिवरायांचा अपमान नाही?@OfficeofUT @NCPspeaks @INCMaharashtra— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 2, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना हात जोडले, म्हणाले…
- Rohit Pawar | महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवारांचं ‘आत्मक्लेश’ आंदोलन
- Sanjay Raut | “आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचं उदयनराजेंना आव्हान
- Jitendra Awhad | “मेहेंदळेंच्या तोंडून हे वाक्य वदवून घ्या”, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना आव्हान
- NCP | इतिहासाचे खोटे दाखले देऊन पवारांवर टीका करायची हे राजकीय षडयंत्र – राष्ट्रवादी काँग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

