Share

Sanjay Raut | “आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचं उदयनराजेंना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आलं. मंगल प्रभात लोढा, संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे.

उदयनराजे म्हणाले, “असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावीत.” तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का?, असा संतप्त सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे उदयनराजे म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “उदयनराजे भोसले यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे यांच्या वाणीतून होत असतो. ते सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. त्यांच्या मनातून चिड बाहेर येणं स्वाभाविक आहे.”

“त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा”, असं आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उदयरानराजे भोसले यांना केलं आहे. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे. उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही, असं मला वाटतं, असं  संजय राऊत म्हणाले.  राऊतांच्या आव्हानाला उदयनराजे भोसले काय उत्तर देतात?, हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!