Share

एकनाथ खडसे म्हणाले राज्यात महाघाडीचचं सरकार येणारं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विजयादशमीचा मुहूर्त साधत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी रावेर मधून आपल्या मुलीचा म्हणजेच रोहिणी खडसे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी एकनाथ खडसे यांनी अनावधानाने राज्यात महाआघाडीचेचं सरकार येणार असा सूतोवाच काढला. आपली चूक लक्षात येता खडसे यांनी लगचेचं स्वतःला सावरून घेतले.

यावेळी खडसे म्हणाले की, आमच्याकडे ते नाथाभाऊंला पाडण्यासाठी आघाड्या बिघाड्या सुरू आहेत ना ! त्यामुळे महाआघाडी चुकून तोंडात आलं. महायुतीचेचं राज्य येणार आहे. बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. मात्र नाथाभाऊ भाजपामध्येच आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊंको गिराओ.. म्हणून आघाड्या बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान भाजपने यावेळेस एकनाथ खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप आता नाथाभाऊंना कोणती जबाबदारी देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारल्याने अनेक विरोधी पक्षांनी नाथाभाऊंना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खडसे यांनी भाजपातचं राहणे पसंत केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!