Share

Eknath Khadse | “मुलाची हत्या की आत्महत्या, बोलायला लावू नका”, महाजनांच्या वक्तव्याला खडसेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,

Published On: 

🕒 1 min read

Girish Mahajan | जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी गेल्यावेळी टीका करताना, ‘बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही’, असे वक्तव्य केले होते. यावर उत्तर देताना मात्र त्यावर गिरीश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केलं.

“मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मला दोन मुली आहेत हे मात्र माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं, त्याच उत्तर खडसे यांनी द्यावं”, असं महाजन म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“माझी ईडी, सीबीआय आणि लाचलुचपत विभागातर्फे चौकशी सुरु आहे. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं आहे. मी ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. दुर्दैवाने जे चाललं आहे, त्याचं वाईट वाटत. महाजन यांना मुलगा नसल्याने त्यांना माझं दु:ख कळणार नाही,” असेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले होते गिरीश महाजन?

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. “मला दोन मुली असून, त्यांना राजकारणात आणलेलं नाही. त्याचा मला आनंद आहे. मात्र, खडसेंना प्रश्न आहे, त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? त्यांच्या मुलाने हत्या झाली की आत्महत्या केली? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातचं खडसेंचं भलं आहे,” असे गिरीश महाजन म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!