🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: घोटाळ्याचा आरोप झाल्यावर पक्षाने मंत्रीपद सोडायला सांगितल ते एका मिनिटात सोडले. मी उमेदवार हवा ही सर्वांची मागणी आहे, मात्र नवीन पिढीला संधी देयला हवी हा पक्षाचा आदेश आहे. पक्षाने रोहिणी खडसे खेवलवर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असं म्हणत खडसे यांनी आपल्या मुलीच्या उमेदवारीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या पवित्र्यात असणारे खडसे यांनी आपली तलवार म्यान केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरु आहेत. सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना पक्षाकडून यंदा उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकनाथ खडसे यांच्यऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी महसूलमंत्री असणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील पक्षाकडून ‘होल्डवर’ ठेवण्यात आलं होत. पक्षातील प्रमुख नेते असताना देखील या तिघांची नावं पहिल्या यादीमध्ये न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र आता शेवटच्या यादीमध्ये नाव न आल्याने खडसे, तावडेंना अखेर भाजपकडून नारळ देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१४ साली विनोद तावडे विजयी झालेल्या बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी कालच पक्ष उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पक्षासाठी प्रामाणिक पणे काम केले आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हंटल होत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खडसे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्टवादी कॉंग्रेसचे नेते अजित पावर थेट एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी जळगावला रवाना झाल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1180016083756965888?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180015832320987136?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180015568021118976?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
