Share

मोठी बातमी : भाजपच्या आढावा बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सध्या राज्यात विभागवार आढावा बैठका घेत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघातील कारणांचा राजकीय समीकरणांचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका सुरू आहेत.

त्यानुसार जळगावात आज, भाजपची विभागवार आढावा बैठक सुरू आहे. पण, एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेच बैठकीला गैरहजर राहिल्यामुळं त्याच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजपमध्ये नेत्यांचा एक गट नाराज आहे. त्यांचं नेतृत्व एकनाथ खडसे करत असल्याचं बोललं जात आहे.

उत्तर महाराष्ट्राची धुरा असलेले गिरीष महाजन तसेच राधाकृष्ण विखे-पाटील आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. पण, एकनाथ खडसेच जळगावच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं भाजपच्या गोटात नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीबद्दल भाजपमधून कोणतिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तसेच, एकनाथ खडसे यांच्या बाजूनेही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण, एकनाथ खडसे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1203247187502587904?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1203244533066035200?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1203223670174318593?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!