Share

एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना ‘खडसावलं’

Published On: 

नागपूर: विरोधी पक्षात आपण सातत्याने मागण्या करायचो, मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा एकदा सरकारवर निशाना साधला आहे.

राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक काम करतात, त्यांना किमान वेतनही दिलं जातं. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा प्रश्न मनरेगाशी संबधित असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यावर आपण निर्णय घेऊ शकत नाही.

या उत्तराने एकनाथ खडसे चांगलेच संतापले आणि पंकजा मुंडेंना झापत, “मी प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबाबत आणि ही योजना राज्य सरकार चालवतं” अस ठणकावून सांगितलं.

त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयाची माहिती घेऊन,ती सभागृहाला दिली जाईल असे आश्वासन देत विषय संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!