Share

#Coronavirus : एकवीरा देवीसह जेजुरीची यात्रा रद्द

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध धार्मिक स्थळे गेल्या काही दिवसांपासून हळूहळू ओस पडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून २३ मार्चला होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय जेजुरी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यात्रेत येणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने जेजुरीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.

पुणे, मुंबईसह कोरोनाचा राज्यात वाढता फैलाव पाहता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रा, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दी होणार्या सर्व कार्यक्रमांना दि. 13 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

याचप्रमाणे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणी, कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकवीरा देवी यात्राही रद्द करण्याचा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

दरम्यान, 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात यात्रा, जत्रा, उत्सव, स्पर्धा आदी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. विवाह सोहळ्यासह खासगी कार्यक्रम कौटुंबिक स्वरूपात आणि लेखी पूर्वपरवानगीने साजरे करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!