Share

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या ‘त्या’ विक्रमावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Published On: 

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेण्याचा विक्रम केला. त्याच्या या कामगिरीवरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी ट्वीट करत एजाज पटेलचे (Ajaz Patel)कौतुक केले आहे.

‘कसोटीत एकाच डावात दहा बळी मिळवण्याची दमदार कामगिरी केल्याबद्दल एजाज पटेलचे अभिनंदन. मुंबईत जन्मलेला आणि आता न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भाग असल्यामुळे आपल्याला अभिमानाची भावना आहे. अशी कामगिरी करणारा एजाज पटेल कसोटी क्रिकेटमधील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.’ असे ट्वीट करत शरद पवार यांनी त्याचे कौतुक केले आहे.

दरम्यान एजाजने १० बळी घेत अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. एजाजच्या या विक्रमानंतर अनिल कुंबळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुंबळेने ट्वीट करत एजाजचे अभिनंदन केले. तो म्हणाला. ‘एजाज तुझं क्लबमध्ये स्वागत आहे. पर्फेक्ट १०. कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात’.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!