Share

श्रीरामपुर शहरात आठ दिवस लॉकडाऊन!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. श्रीरामपुर तालुक्यातही कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुरुवातीला श्रीरामपुर शहर तसेच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु आता तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसांत श्रीरामपुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणूनच आज प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत संपूर्ण श्रीरामपुर शहर रविवार १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरुवातीच्या काळात श्रीरामपुर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अल्प प्रमाणात होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या प्रचंड वाढल्याने अखेर प्रशासनाला लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून बाधितांचा वेग वाढला आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागल्याने प्रशासन हतबल झाले होते.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी श्रीरामपुर शहरात आठ दिवस लॉकडाऊन करून, जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेरीस प्रशासन, व्यापारी, विविध संघटना, आणि पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत श्रीरामपुर शहर १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

दिशा सालीयानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते- नुपूर मेहता

हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान : सचिन सावंत 

टेढे मुहं वाले पवारसेना को जनता क्वारंटाईन करेगी: कंगणाच्या आईचं वादग्रस्त वक्तव्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!