Share

हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान : सचिन सावंत 

Published On: 

मुंबई : अभेनेत्री कंगना रनौतच्या टीकेवर काँग्रेसने हे भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हणत भाजपवर वर हल्लाबोल केला आहे. हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे. तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

“कोणी पूर्वीचा अट्टल ड्रगअॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच आहेत, अशा शब्दात सावंतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. महाराष्ट्र द्रोही भाजपलाला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ" अशी टीका सावंत यांनी भाजपवर केली आहे

 

दरम्यान बीएमसीने कंगनाच्यावर ऑफिसवर कारवाई केल्याने कंगनाने ‘ आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत ठाकरे सरकारची तुलना बाबराशी केली . आज तिथे बाबर आला आहे, पण बाबर तु हे लक्षात ठेव, तिथे पुन्हा राममंदिर उभारलं जाईल, “जय श्रीराम” असं ट्विट केले .

महत्वाच्या बातम्या

टेढे मुहं वाले पवारसेना को जनता क्वारंटाईन करेगी: कंगणाच्या आईचं वादग्रस्त वक्तव्य

‘तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत

कंगनाच्या ट्विटला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर म्हणतात

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!