Share

इगो बाजूला ठेऊन चर्चा करावी, आरोह वेलणकरचा शेतकरी आणि सरकारला सल्ला

Published On: 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

देशभरातून शेतकरी आंदोलनाला समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील या आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. दरम्यान, सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनाविषयी कलाकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, मराठी अभिनेता आरोह वेलणकरने देखील महाराष्ट्र देशाशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.

“या देशात शेतकरी आंदोलन होणे दुरदैवी आहे. अनेक राजकीय पक्ष शेतकरी आंदोलनावर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. मी शेतकऱ्यांबरोबर असलो तरीही सरकारने लागू केलेल्या तीन कायद्यांना माझा पाठिंबा आहे. कारण तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तर मला असे वाटते की, शेतकऱ्यांनी आणि सरकारने याविषयावर सोबत बसून सविस्तर चर्चा केली पाहिजे. सरकार शेतकऱ्यांसोबबत बोलायला तयार आहे. पण शेतकऱ्यांचं अस म्हणणं आहे कि, तीन कायदे मागे घ्या मगच आम्ही बोलू पण मला असे वाटते की सरकारने आणि शेतकऱ्यांनी आपला ‘इगो’ बाजूला ठेऊन चर्चा केली पाहिजे. आणि शेतकऱ्यांसोबत मीच काय तर प्रत्येकजण आहे.”

दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!