Share

चक्रीवादळाचा पुण्यातही ‘इफेक्ट’; झाडे कोसळण्याच्या ३१ घटनांची नोंद !

Published On: 

पुणे : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करण्यात आली असून प्रशासन देखील सज्ज आहे.

हे चक्रीवादळ आता गोव्याकडून महाराष्ट्र किनारपट्टीच्या बाजूने पुढे सरकत आहे. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगडमध्ये समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतयं. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरील ६२, तसंच खाडी किनाऱ्यावरील १२८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुफानी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.

पुणे शहरात देखील काल रात्रीपासूनच ढगाळ वातावरण असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. यामुळे ३१ ठिकाणी झाड कोसळल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ‘वादळी वारा आणि पाऊस यामुळे अग्निशमन दलाकडे शहराच्या विविध भागात काल रात्री ९ ते आज दुपारी ४ वाजेपर्यंत झाडपडीच्या एकूण ३१ घटनांची नोंद झाली असून सुदैवानं कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही. अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून सर्व अधिकारी जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!