औरंगाबाद : सैराट चित्रपटापासून प्रकाशझोतात आलेले नागराज मंजूळें सध्या शहरात शूटिंग लोकेशन पाहण्यात व्यस्त आहे. आगामी चित्रपटात शहरातील काहीं भागाचे चित्रीकरण मंजूळे करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी शहरालगत असलेल्या ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या परिसराची पाहणी मंजूळे यांनी सोमवारी गोपनिय रित्या केली.
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा फटका चित्रपट सृष्टीला मोठ्याप्रमाणात बसला आहे. छोट्या पडद्या व्यतिरिक्त चित्रपटाचे चित्रीकरण फार कमी प्रमाणात झाले. महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात जिथे कमी संसर्ग आहे. अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. याच धर्तीवर अनेक निर्माते, दिग्दर्शक सध्या शहरात लोकेशन पाहत आहे.
आगामी चित्रपटात शहरातील विविध भाग मंजूळे चित्रीत करणार असून यात देवगिरी किल्ल्यावर चित्रपटातील मोठे सिन शुट करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र ते कोणता चित्रपट देवगिरी किल्ल्यावर चित्रीत करणार आहे, याची गोपनियता कटाक्षाने पाळली जात आहे. दरम्यान दौलताबाद येथील एका हॉटेलमध्ये चर्चा करतांनाचे छायाचित्र ‘महाराष्ट्र देशा’ च्या हाती लागले.
महत्वाच्या बातम्या :
- मुश्रीफ तुम्ही शंभर काय हजार कोटींचा दावा टाका, पण…; चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- भाजपा अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर चिदंबरम यांची टीका
- ‘बलात्काऱ्यांना देहदंडाचीच शिक्षा व्हावी अशी कायद्यात तरतूद करा’, उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
- ‘महिलांवर अत्याचार होऊ नये ही सरकारची भूमिका; भाजपशासित राज्यांमध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचे काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
