औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच अक्रमक झाली आहे. बुधवारी राज्यभरात अनेक ठिकाणी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तर 26 सप्टेंबरला मराठवाड्यातील औरंगाबादसह विविध शहरात तसेच ग्रामीण भागात बंदची हाक देण्यात आली आहे.
औरंगाबद शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसतर्फे बंदची हाक देण्यात आली आहे. यामूळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात बंद पाळण्यात येणार आहे. यासह जालना, उस्मानाबाद, बीड, परळी, लातूर,लेणापुर,नांदेड,परभणी, हिंगोली यासह मराठवाड्यातील ग्रामीण भागात 26 सप्टेंबरला आंदोलन आणि बहुतांश सर्वच ठिकाणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आली आहे.
परळीत आज बंद पाळणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली, यानिमित्त गुरुवारी (ता.26) परळी बंदची हाकही देण्यात आली आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता.25) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप करून सरकारचा निषेध केला. अजय मुंडे, लक्ष्मण पौळ, बाजीराव धर्माधिकारी, बाळासाहेब देशमुख, वाल्मीक कराड, चंदुलाल बियाणी, माणिक फड, डॉ. संतोष मुंडे, नगरसेवक अनिल अष्टेकर, भाऊ कराड, संजय फड, जयप्रकाश लड्डा, शरीफ भाई, रामदास कराड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रेणापूर शहर बंदचे आवाहन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्यावर ईडी’ने गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी रेणापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी (ता. 25) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून गुरुवारी (ता. 26) रेणापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सदर बॅंकेचे आणि संस्थेचे पदाधिकारी व सदस्य नसताना या सरकारने अगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ईडी’ला हाताशी धरून पवार यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा निषेध करीत हा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार साळुंके, रेणापूर शहराध्यक्ष बालाजी कदम, प्रदेश सदस्य रघुनाथ कुचेकर, राम पवार, बाळासाहेब देशमुख, मंगल राऊतराव, धनंजय चव्हाण, राजेश चव्हाण, कमलाकर जाधव, प्रमोद जाधव, उत्तम राठोड, किशोर माने, नीळकंठ भिसे, मनोज कातळे, रूपेश चक्रे, गोरखनाथ निंबाळकर, बापूसाहेब पवार, सुधाकर राठोड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177098522656509952?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177095842034900992?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177095598824050688?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

