टीम महाराष्ट्र देशा : राज्याचा २०१८ – १९चा आर्थिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के वाढ झाली आहे, तर कृषी आणि उद्योग दरात घट झाली आहे. गेल्या वेळीही इतकाच म्हणजे 7.5 टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज होता. महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक लागतो.
मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात आठ टक्के घट झाली असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यात 1.1 टक्क्यांची अल्पशी वाढ दिसून येत आहे. राज्याच्या दरडोई उत्पादनात यंदा कोणतीही वाढ झालेली नसून दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

