Share

नाशिकमध्ये कोरोना आढावा बैठकीदरम्यान छगन भुजबळ आणि भाजप आमदारामध्ये खडाजंगी

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ,कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह स्थानिक आमदार खासदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच वाढत्या रुग्णसंख्येबाबत लोकप्रतिनिधींची मतं घेतली आहेत.

परंतु यावेळी देवळा-चांदवड विधानसभेचे भाजप आमदार राहुल आहेर आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. भाजप आमदार राहुल आहेर यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला. नाशिक जिल्हा रुग्णलयात बेड वाढवले जात नाहीत,काही बेड पडून आहेत, तर कळवणच्या ग्रामीण रुग्णलयात सिटी स्कॅन मशीन धूळखात पडून आहे. त्याचा वापर का केला जात नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर छगन भुजबळांनी सूचना करा म्हणून सुनावलं यावेळी चांगलीच शाब्दिक चकमक झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ५० हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!