लातूर: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोविड-१९ रुग्णांसाठी क्ष-किरण विभाग वरदान ठरला आहे. या विभागात मागील एक वर्षामध्ये तब्बल १० हजार ३६२ रुग्णांच्या सी. टी. स्कॅनचा विक्रमी टप्पा पार करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक्सरे तपासणीचा सुध्दा तब्बल ४५ हजार ७९४ इतका उच्चांक गाठण्यात आला असून या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असून यापुढील कालावधीतही यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे मत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या लाटेमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये गेल्या वर्षीच्या ३१ जून पासुन अविरतपणे गरजु रुग्णांना माफक दरामध्ये सी. टी. स्कॅन तपासणी व एक्सरे तपासणी उपलब्ध करुन देण्यात आली. विशेषत: कोरोनाच्या रुग्णांसाठी तपासणीच्या दिवशीच अंतिम अहवाल रुग्णांना देण्यात येतो. तसेच सी. टी. स्कॅन तपासणीमध्ये किती स्कोर आहे यावरुन रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण किती प्रमाणात झाली आहे याची माहिती त्वरीत मिळत असल्यामुळे रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेत मिळण्यास मदत होते, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी एक्सरे तपासणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागातील ज्या रुग्णांना व्हेंटीलेटर व ऑक्सीजनची आवश्यकता आहे. तसेच ज्या रुग्णांचे सी. टी. स्कॅन करणे शक्य नाही, अशा रुग्णांची जागेवरच एक्सरे करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर विद्यापीठाने संघटनांच्या आक्षेपानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जागा बदलली!
- देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं ; अशोक चव्हाणांचा टोला
- लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप
- औरंगाबादसह हिंगोली मधील म्हाडाच्या सदनिकांची गुरूवारी ऑनलाईन सोडत
- ‘फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

