Share

तेव्हा रात्री २ वाजता मोदी फोन करायचे – अमित शहा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने यश मिळवत सत्ता मिळवली आहे. गुजरातमध्ये मागील २२ वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजपला यंदाची निवडणूकीत चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये काँगेसने चांगला जोर धरल्याने त्याचे पडसाद निकालांवर देखील दिसून आले.

गुजरातमध्ये १५० जागा मिळवण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपला ९९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र हि सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मेहनत घेतली होती. पक्षाची रणनीती आणि प्रचारसभांबद्दल माहिती घेण्यासाठी नरेंद्र मोदी अर्ध्या रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांना फोन करत असल्याची माहिती खुद्द शहा यांनीच दिली आहे.

गुजरातमधील प्रचार दरम्यान नरेंद्र मोदी हे कधी मध्यरात्री २ वाजता तर पुन्हा सकाळी ६ वाजता आपल्याला फोन करायचे, त्यामुळे ते झोपतात कि नाही असा प्रश्न पडत असल्याचही शहा यांनी सांगितले. बुधवारी पार पडलेल्या संसदीय समितीच्या बैठकीत अमित शहा यांनी हा खुलासा केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!