Share

आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाचा निर्णय तीन महिन्यात लागणार असेल तर आपण थांबायला हवं. आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय.मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबावायला हवं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलंय. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत हे आवाहन केलं आहे.

दरम्यान,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने काल उग्र रूप धारण केल्याचं पहायला मिळालं. राजगुरूनगर आणि चाकणमध्ये तर आंदोलनाचा भडका उडाला होता. काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. काल उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी झाले होते.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मोठा वणवा पेटला असून अनेक ठिकाणी हिसाचार होताना पहायला मिळतंय. काही आंदोलकांनी तर आत्महत्या देखील केल्याने मराठा तरुणांच्या रोषाचा भडका उडाला आहे या पाश्वभूमीवर मराठा समाजाला शांत करण्याची गरज असल्याचं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले यांनी म्हटलं आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठा क्रांती मोर्चा : पोलिसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू

गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!