Share

फी न भरल्याने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापठानेच अडवले अनेक महाविद्यालयांचे निकाल!

Published On: 

पुणे: गेले ४ महिने कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलेले आपल्याला पाहायला मिळाले.तर देशातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनांचे आता पर्यंत एकूण लाखो रुग्ण सापडले आहेत. या रोगाच्या संसर्गाच्या प्रतिबंध घालण्यासाठी टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन करण्यात आले होते. ज्यामुळे, सर्व सामान्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसल्याचे दिसून आले होते.

शैक्षणिक क्षेत्राला देखील या परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक विद्यार्थ्यांच्या घरातील पालकांना रोजगार गमवावा लागला, तर काहींचे वेतनच अडवले गेले आहे. अशातच विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरायसाठी आणायचे तर कुठून? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी निगडित पुण्यातील महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी हे बाहेर गावचे आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे मध्यमवर्गीय, शेतकरी वा आर्थिक परिस्थिती बेताची असणारे आहेत. आधीच, परीक्षांचा उडालेला गोंधळ आणि त्यात कमी म्हणून राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे अंतिम वर्ष सोडून विद्यापीठाच्या सर्व शाखांचे सरासरी निकाल लावण्यात येणे अपेक्षित होते.

देश भावूक होतो अन हे फाईल्स गायब करतात, चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा परत मोदींवर निशाणा

गेल्या काही आठवड्यात विद्यापठाने अभियांत्रिकी, लॉ, इतर व्यावसायिक, अव्यवसायिक अभ्यासक्रमांचे अंतिम वर्ष वगळता सर्व वर्षांचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांतील पदवीच्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून ठेवल्याचा प्रकार आता समोर येत आहे. दरम्यान, काही विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू न शकल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवणे कितपत योग्य आहे असा सवाल महाविद्यालय प्रशासनांनी उपस्थित केला आहे. तर, आधीच संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ या खाजगी वृत्त वाहिनीने बातमी दिली आहे.

खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास केव्हाचा गमावला आहे;सचिन सावंताची जहरी टीका

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘ विद्यापीठाने निकाल राखीव ठेवल्याने महाविद्यालयांना संबंधित विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 18 हजारांच्या आसपास असण्याची शक्‍यता आहे. जवळपास 60 लाख रुपये परीक्षा शुल्क प्रलंबित असल्याची,’ माहिती त्यांनी दिली.

‘त्या’ पदावरून अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करा : विनायक मेटे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!