Share

 बेशिस्त वागतो म्हणून खडसावल्यामुळे विद्यार्थाचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला 

Published On: 

पुणे : एका शालेय विद्यार्थाने शिक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी पुण्यातील वाघोली परिसारतील वाडेबोल्हाई येथे घडली. वर्गात बेशिस्त वागतो तसेच केस कापायचे सांगितल्यामुळे विद्यार्थाने  शिक्षकावर हल्ला केला.

अकरावीत शिकणाऱ्या सुनील पोपट भोर या विद्यार्थाने सकाळी ८ वाजता प्रार्थना चालू असतांना उस तोडण्याच्या कोयत्याने शिक्षकावर हल्ला केला. विद्यार्थाच्या हल्ल्यात जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयातील, उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दर्शन चौधरी , धनंजय आबनावे हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भोर हा महाविद्यालयात बेशिस्तपणे वागायचा. डोक्यावरचे केस वाढवल्यामुळे दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी त्याला समज दिली होती. यावेळी त्यांनी भर वर्गात सुनीलची खरडपट्टी काढली होती. याचाच राग सुनीलच्या मनात होता. आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत होते. त्यावेळी सुनीलने त्याच्याजवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने दर्शन चौधरी आणि धनंजय अबनावे यांच्यावर वार केले.  शिlक्षकांना वाघोली येथेल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षकांवर केलेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थी फरार असून लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!